By: cine katta | August 21, 2017

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ‘लालबागच्या राजा’ च्या दर्शनासाठी मुंबईकरांबरोबरच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात. नवसाला पावणाऱ्या बाप्पाचं मुखदर्शन व्हावं हे प्रत्येकाची इच्छा असते, पण ते प्रत्येकाला शक्य होतच असं नाही. ज्यांना प्रत्यक्ष दर्शन शक्य नाही अशा भक्तांसाठी फक्त मराठी चित्रपट वाहिनीने एक खास भेट आणली आहे.


शुक्रवार २५ ऑगस्ट गणेश चतुर्थी पासून ते मंगळवार ५ सप्टेंबर अनंत चतुर्दशी पर्यंत दररोज सायंकाळी ६.३० वाजता लालबागच्या राजाचे दर्शन आणि राजाची संपूर्ण आरती घरबसल्या पहायला मिळणार आहे. गणेशोत्सवाच्या दरम्यान गणपती बाप्पाशी संबधित अनेक नाविन्यपूर्ण कार्यक्रम सुद्धा पहायला मिळणार आहे. या विषयी बोलताना फक्त मराठी वाहिनीचे बिझनेस हेड श्याम मळेकर सांगतात की, मनोरंजनासोबत प्रेक्षकांची अभिरुची जपत अनेक कल्पक उपक्रम आम्ही ...

Category: Entertainment Updates 

Tags:

By: cine katta | August 21, 2017

आजवर बऱ्याच मराठी कलाकारांनी कसदार अभिनयाच्या बळावर भारतीय चित्रपटसृष्टी गाजवली आहे. रंगभूमीपासून रुपेरी पडद्यापर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. दशकानु दशकं रसिकांची सेवा करणारे हे कलाकार आपापल्या परीने चित्रपटसृष्टी सशक्त बनवण्याचं काम करीत आहेत, पण या सर्वांना एकत्र आणून एखादी संवेदनशील कलाकृती तयार करण्याची किमया अद्याप कोणीही केलेली नाही. निर्माता-दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर यांनी ‘शिवाजी पार्क मुंबई २८’ या आगामी चित्रपटात हि किमया साधली आहे.

केवळ मराठीतच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीतही लोकप्रिय असलेले दिलीप प्रभावळकर, विक्रम गोखले, अशोक सराफ, सतीश आळेकर, शिवाजी साटम हे दिग्गज कलावंत ‘शिवाजी पार्क मुंबई २८’ या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच एकत्र काम करताना दिसणार आहेत. सोबत शरद पोंक्षे, उदय टिकेकर, सवित...

Category: Entertainment Updates 

Tags:

By: cine katta | August 21, 2017

काय झालं कळंना

काही गाणी गीत-संगीतामुळे लोकप्रिय होतात, तर काही त्यातील कलाकारांच्या लोकप्रियतेमुळे.... तर काही कोरिओग्राफीमुळे...पण काही गाणी मात्र सादरीकरण आणि नयनरम्य लोकेशन्समुळेही रसिकांच्या मनाचा ठाव घेण्यात यशस्वी होतात. सुरेख सादरीकरण आणि नेत्रसुखद लोकेशन्स यांचा अचूक मिलाफ असलेलं ‘काय झालं कळंना’ या चित्रपटातील ‘काय झालं कळंना...’ हे नवं कोरं गाणं लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. श्री धनलक्ष्मी प्रोडक्शन प्रा. लि. प्रस्तुत व पंकज गुप्ता यांची निर्मिती असलेल्या ‘काय झालं कळंना’ या चित्रपटात एक प्रेमकथा पहायला मिळणार आहे.


प्रेमकथेला सुमधूर गीत-संगीताची जोड दिल्यास ती रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यात यशस्वी होते. ‘काय झालं कळंना’ या चित्रपटातील प्रेमकथेलाही दिग्दर्शिका सुचिता शब्बीर यांनी कर्णमधुर गीतांची किनार जोडली असून कोरिओग्राफर सुजीत कुमार...

Category: Entertainment Updates 

Tags:

By: cine katta | August 14, 2017

‘अमोल कागणे फिल्म्स प्रस्तुत’ हलाल चित्रपटाचे टिझर आज सावित्रीबाई फुले विद्यापीठ आजीवन अध्ययन व विस्तार विभाग पुणे आणि मुस्लीम सत्याशोधक मंडळ हमीद दलवाई स्टडी सर्कल तर्फे आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात पुणे येथे कलाकार व तंत्रज्ञ, विविध मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखदाररीत्या संपन्न झाला. यावेळी सुप्रसिध्द अभिनेता व दिग्दर्शक अमोल पालेकर, राष्ट्रीय एकात्मता समितीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव, मुस्लीम सत्यशोधक मंडळ अध्यक्ष डॉ. शमसुद्दीन तांबोळी, डॉ. धनंजय लोखंडे, डॉ. सतीश शिरसाठ, सरहदचं संस्थापक संजय नहार, दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील, अभिनेत्री प्रितम कागण आदी मान्यवर उपस्थित होते.
येत्या 29 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. प्रदर्शनाआधीच कान्स फिल्म फेस्टिव्हल, महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार, पुणे फिल्म फेस्टिव्हल, औरंगाबाद फिल्म फेस्टिव्हल...

Category: Entertainment Updates 

Tags:

By: cine katta | August 14, 2017

काही कलाकार केलेल्या कामांमुळे ओळखले जातात. त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखांचा ठसा रसिकांच्या मनावर असा काही उमटतो की, प्रेक्षक त्यांना पुनःपुन्हा नवनवीन भूमिकांमध्ये पाहण्यासाठी आतुरतात. झी मराठी वाहिनीवरील ‘जय मल्हार’ या मालिकेत खंडेरायांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता देवदत्त नागे यांनी प्रेक्षकांवर अशी काही जादू केली की,अवघ्या महाराष्ट्रातीलच नव्हे तर परदेशात वसलेला मराठमोळी प्रेक्षकही त्यांच्या अभिनयावर फिदा झाला. हेच देवदत्त नागे सध्या काय करत आहेत? हा प्रश्न अनेकांना सतावत होता. या प्रश्नाचं उत्तर मिळालं असून लवकरच ते एका नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

साक्षी व्हिजन प्रॉडक्शनच्या बेनरखाली बनणाऱ्या डॉ. सीमा नितनवरे आणि देवदत्त नागे यांची निर्मिती असलेल्या ‘चेंबूर नाका’ या आगामी मराठी चित्रपटात देवदत्त एका नव्या रूपात मराठ...

Category: Entertainment Updates 

Tags:

next>>