By: cine katta | April 25, 2020

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील लोकांमद्धे भीतीचे वातावरण पसरले आहे, इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाबाधितांची सध्या संख्या कमी असली तरीदेखील हा आकडावाढतच चालला आहे, याचा परिणाम म्हणून अनेकांच्या मनामद्धे नकारात्मकता वाढत आहे. याच धर्तीवर लोकांमध्ये सकारात्मकता वाढवण्यासाठी अनेक कलावंतांनी एकत्र येऊन "पुन्हा एकदा गरुड भरारी घेऊ" हे नवं कोरं गाणं रसिकांसमोर आणलं आहे. विशेष म्हणजे या गाण्याचे ध्वनिमुद्रण आणि चित्रीकरण हे दोन्ही सर्व कलाकारांनी घरातून मोबाईलच्या साहाय्याने केले असून, तांत्रिक बाबींच्या साहाय्याने शक्य तितकं स्टुडिओ ध्वनिमुद्रणाच्या बरोबरीचं करण्याचा प्रयत्न केला आहे.

गाण्यात दीपाली सय्यद, मनोज जोशी, किशोरी शहाणे, मकरंद अनासपुरे, रेणुका शहाणे, शिल्पा अनासपुरे, पुष्कर जोग, स्मिता गोंदकर, शरद पोंक्षे, वर्षा उसगावकर, मानसी ...

Category: Marathi Movie marketing 

Tags:

By: cine katta | March 28, 2020

Aditi Yevale

मराठी इंडिस्ट्रीत अभिनेत्री म्हणून नावलौकिक मिळवणारी अभिनेत्री अदिती येवले, भूमिकेची जाण आणि सतत काहीतरी नवीन करण्याची धडपड अदिती मद्धे जाणवते. आजवर तिने वेलकम जिंदगी, विकून टाक, नेबर्स अश्या चित्रपटातून तिने भूमिका केल्या असून एक नंबर, रुंजी, तसेच कुलस्वामिनी अश्या अनेक मालिकांमधून ती रसिकांच्या समोर आली आहे. नेबर्स हा तिचा चित्रपट कोरोना व्हायरस च्या जागतिक संकटामुळे पुढे गेला.

एकंदरीत आजवरच्या काराकिर्दीबाबत तिच्याशी चर्चा केली असता तिने कुलस्वामिनी या मालिकेतली श्रेया या भूमिकेमुळे आपल्याला ओळख मिळाली आणि त्यामुळेच घराघरात पोहोचता आलं असल्याचं सांगितलं, सध्या अदितीकडे मराठी सोबतच काही पंजाबी चित्रपटाच्या देखील ऑफर्स आहेत, त्यामुळे कथा चांगली असेल तर निश्चित त्यामद्धे काम करायला आवडेल असं अदिती सांगते.

Category: Marathi Movie Box Office 

Tags:

By: cine katta | February 29, 2020

व्हेलेंटाईन वीक नुकताच सर्वांनी साजरा केला. या निमित्तानेच प्रेमावर आधारित स्वराज्य फिल्म प्रोडक्शन निर्मित ‘हरवले मन माझे’ हे गाणे रसिकांच्या नुकतेच भेटीला आले असून प्रेक्षकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. इंडियन आयडॉल उपविजेता सुप्रसिद्ध गायक रोहित राऊत यांनी हे गाणं गायलं असून गाण्याचं संगीत कुणाल आणि करण यांचे आहे, तर अर्जुन गोरेगावकर, शिल्पा ठाकरे, शिल्पा तुळसकर, सविता हांडे, स्नेहल भुजबळ, श्याम दंडवते यांच्यावर ते चित्रित झालं आहे.

निसर्गरम्य लोकेशन्सवर खुलणाऱ्या या ही प्रेम गीताचे दिग्दर्शन धनंजय साबळे यांनी केलं असून, सिनेमॅटोग्राफी मिलिंद कोठावळे यांनी केलेली आहे. विशेष म्हणजे या गाण्यासाठी ड्रोनचा अतिशय सुंदर वापर करण्यात आला आहे. रसिकांचा गाण्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून आनंद आनंद वाटत असल्याची भावना यावेळी गीताच...

Category: Uncategorized 

Tags:

By: cine katta | February 01, 2020

भारतीय सिनेसृष्टीत काही कलाकारांनी बालवयापासूनच अत्यंत सुरेख अभिनयाचं दर्शन घडवत रसिकांची मनं जिंकली आहेत. यात ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यापासून मराठमोळ्या बालकलाकारांचाही फार मोलाचा वाटा आहे. या परंपरेतील सहजसुंदर अभिनयाचा वारसा जपत मराठी सिनेमांसोबतच हिंदीतही आपल्या अभिनयाचा जलवा दाखवणारी मृणाल जाधव ही चुणचुणीत बालकलाकार आता एका नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'भयभीत' या आगामी मराठी सिनेमात मृणाल एका महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन दीपक नायडू यांनी केलं आहे. 'अॅक्च्युअल मुव्हीज प्रोडक्शन्स’ आणि 'ब्राऊन सॅक फिल्म्स प्रा.लि’ यांची प्रस्तुती असलेल्या 'भयभीत' सिनेमाची निर्मिती शंकर रोहरा, दिपक नारायणी यांनी केली आहे.


मृणालचं नाव घेताच अजय देवगण अभिनीत 'दृश्यम' या हिंदी रहस्यपटातील छोट्या मुलीचा चेहरा डोळ्यां...

Category: Uncategorized 

Tags:

By: cine katta | January 25, 2020

Zareen Khan

Zareen Khan was honoured with the Best Actress Award for "Hum Bhi Akele, Tum Bhi Akele", coincidentally she received this award on the same day where she embarked her journey, 10 years ago in bollywood.


Elated Zareen expressing her triumph says, "I feel overwhelmed on receiving this award. Hum Bhi Akele , Tum Bhi Akele already won the best film award in South Asian international film awards that happened in New York .
And now Rajasthan International film festival has awarded me the best actress Hindi feature film."

"This award is going to always be very special for me because, I received it exactly on the same day that marked my 10 years in this industry and also from the same city where my first film Veer was shot,...

Category: Bollywood 

Tags:

next>>