By: cine katta | January 21, 2019

लिम्बोनीच लिंबू या गाजलेल्या अल्बमची नायिका सुवर्णा दराडे यांच्या या गाण्याने २ करोड विव्ज क्रॉस केल्या आहेत. सुवर्णा दराडे सांगते दिग्दर्शक जितेंद्र वाईकर यांनी मला या गाण्यात प्रथम संधी दिली, मला माहित हि न्हवता कि काय गाणं आहे, कोण संगीतकार गायक आहे .त्यांनी मला गाण्याचा ट्रक पाटवला, माज्या घरी सर्वाना आवडला ,पण तरीही माझ्या मनात थोडीशी धुक धुक होती कारण गाण्याचा जोनर थोडासा वेगळा होता . जितेंद्र वाईकर सरांना गाण्यावर आणि माझ्यावर विश्वास होता. त्यांनी मला सांगितला कि हे गाणं हिट होणारच, आणि झालं तेच , आज सगळ्याच चांनेल्स्वर आणि युटूब वर सुपरहिट चालू आहे. आयुष्यातला पहिला अल्बम आणि सुपर हिट म्हणून हे गाणं मला खूप जवळचं आहे. सुमीत कॅसेट कम्पनीच हे गीत हर्षित अभिराज यांनी संगीतबद्ध केलं आहे, ना धो महानोर यांचे गीत असून उत्तरा केळकर यांनी ...

Category: Entertainment Updates 

Tags:

By: cine katta | January 07, 2019

मागील काही वर्षांपासून गीतकार गुरू ठाकूर हे नाव केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर भारताबाहेरही चांगलंच गाजत आहे. गुरूच्या लेखणीतून अवतरलेली मराठमोळी गाणी सातासमुद्रापार रसिकांचं मनोरंजन करीत आहेत. गुरूने लिहिलेलं एखादं गाणं अमेरिकेतील रेडिओ स्टेशनवर वाजणं आणि तिथल्या मराठी बांधवांनी ताल धरणं ही मराठी सिनेसृष्टीसाठी अभिमानास्पद बाब आहे. शब्दांवर प्रभुत्व असल्याने रसिकांचा आवडता गीतकार बनलेला गुरू आता पार्श्वगायनाकडे वळला आहे. ‘कृतांत’ या आगामी मराठी सिनेमासाठी गुरूने पार्श्वगायन केलं आहे.

मुख्य भूमिकेतील अभिनेता संदिप कुलकर्णाच्या काहीशा वेगळया गेटअपमुळे चर्चेत आलेला ‘कृतांत’ हा आगामी सिनेमा गुरू ठाकूरच्या पार्श्वगायनामुळे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. ‘रेनरोज फिल्म्स’च्या बॅनरखाली मिहीर शाह यांची निर्मिती असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन दत्ता म...

Category: Entertainment Updates 

Tags:

By: cine katta | January 07, 2019

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल काही सांगता येत नाही. सध्याच्या घडीला मराठी चित्रपटसृष्टीसोबत म्युझिक अल्बमही वेगवेगळ्या धाटणीचे बनत चाललेत. अशातच अस्सल मराठमोळ्या ठसक्यात गायिका वैशाली माडेच्या सुमधूर आवाजात  एक म्युझिक अल्बम अलिकडेच रिलीज झाला आहे. 'डीजे वाला दादा' असे नव्या गाण्याचे बोल आहेत. सोशल मीडियावर त्याच्या या गाण्याला भरघोस प्रतिसाद मिळत आहे.

व्हिडीओ पॅलेस प्रस्तुत आणि राज एक्स्लेन्सी क्रिएशन असलेल्या या गाण्यात नवोदित अभिनेत्री  दिपाली सुखदेवे हिने भन्नाट डान्स केला आहे. प्रिती नाईक निर्मित आणि पराग भावसार यांनी हे गाणे दिग्दर्शित केले आहे. या गाण्याची सोशल मिडीयावर प्रचंड क्रेज पाहायला मिळत आहे.

सद्यस्थितीत डीजे ऑपरेटरवर आधारित अनेक हिंदी - मराठी गाणी आली असली तरी गीतकार कौतुक शिरोडकर  यांनी लिहीलेले गाणे थोडय...

Category: Entertainment Updates 

Tags:

By: cine katta | January 07, 2019

आपल्या सर्वांना परिचित असलेला लाडका अभिनेता सक्षम कुलकर्णी आता एका नव्या भूमिकेमुळे सध्या चर्चेत आहे. सक्षमने आजवर आपल्या अभिनयाच्या जोरावर सर्वांनाच आपलेसे केले आहे. 'दे धक्का', 'पक पक पकाक', 'शिक्षणाच्या आयचा घो' इ. चित्रपटांतून त्याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. सध्या कॅफेमराठीच्या 'एव्हरी मराठी हाऊस पार्टी एवर' मध्ये त्याने साकारलेला पप्या राणे मराठी प्रेक्षकांमध्ये चांगलाच लोकप्रिय होत आहे.

 

नुकत्याच त्याने कॅफेमराठीच्या “पॅडेड की पुशप” या वेब सिरीज मध्ये देखील सक्षम कुलकर्णी अफलातून भूमिकेत होता. सक्षमने कॅफेमराठी सोबत अशा प्रकारचा कॉमेडी व्हिडीओ पहिल्यांदाच केला आहे. त्याने साकारलेला पप्या पहिल्याच व्हिडीओ मध्ये प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. मराठी मुलांच्या घरातील पार्टी कशी असते हे विनोदी अंगाने दाखवण्यात आले आहे. त्याची बो...

Category: Entertainment Updates 

Tags:

By: cine katta | January 06, 2019

भावेश काशियानी फिल्म्स प्रस्तुत व आयड्रिम्झ फिल्मक्राफ्टच्या संयुक्त विद्यमाने तयार झालेला “कॉलेज डायरी” हया मराठी चित्रपटाचा संगीत अनावरण व जागतिक विक्रम सोहळा नुकताच मुंबईत आयोजित करण्यात आला होता. बॉलीवुडचे सुप्रसिद्ध पार्श्वगायक बेन्नी दयाल यांच्या शुभहस्ते मोठ्या दिमाखात हया सिनेमाचा संगीत अनावरण सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी निर्माते भावेश काशियानी, दिग्दर्शक अनिकेत जगन्नाथ घाडगे, गायक व संगीतकार निरंजन पेडगावकर, रेवा यांच्यासहित अनेक मान्यवर तसेच चित्रपटातील प्रमुख कलाकार, म्युझिक टीम व प्रॉडक्शन टीम उपस्थित होती.

“कॉलेज डायरी” हा भारतातील पहिला चित्रपट असेल ज्यात मराठी, हिन्दी, संस्कृत, तमिळ व इंग्लिश हया पाच विविध भाषेतील गाणी आहेत. मराठीत सिनेमात प्रथमच एकाच चित्रपटात विविध भाषेतील गाणी दाखवण्याचा जागतिक विक्रम हया चित्रपटाने केला ...

Category: Entertainment Updates 

Tags:

next>>