By: cine katta | March 21, 2018

मराठी सिनेमात जसा आशय वेगवेगळा हाताळला जातो तसाच मराठी संगीतात देखील आता नवनवीन प्रयोग येऊ लागले आहेत. असाच एक अनोखा प्रयोग आराध्य फिल्म्स निर्मित हिच्यासाठी काय पण या सिनेमात संगीत दिग्दर्शन हर्षित अभिराज यांनी केला आहे. उज्वला पोळ कार्यकारी निर्मात्या असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शक मिलिंद दास्ताने असून, कथा, पटकथा आणि सवांद संतोष पवार यांचे आहे.


मराठीत पहिल्यांदाच गाण्यात हॉंटिग इफेक्ट वापराबद्दल संगीत दिग्दर्शक हर्षित अभिराज म्हणाले की, खरंतर सिनेमात एक गोंधळाचं गाणं आहे, ज्यात देवीच्या शक्तीपीठांचा धावा करण्यात आला आहे. जगदीश पिंगळे यांनी लिहिलेया या गाण्याला आनंद शिंदे आणि मी स्वतः स्वर साज चढवला आहे. विशेष बाब म्हणजे आम्ही पहिल्यांदाच मराठीत या गोंधळाच्या गाण्यासाठी हॉंटिग इफेक्ट वापरत आहोत, जो सिनेमातील कथानकाचा भाग असल्याने आम्ही या ...

Category: Entertainment Updates 

Tags:

By: cine katta | March 13, 2018

रुपेरी पडद्यावरील लग्नांबाबत बोलायचं झालं तर इथली बरीच लग्न अविस्मरणीय ठरली आहेत. रुपेरी पडद्यावरील अशाच एका लग्नाची चर्चा मागील काही दिवसांपासून चित्रपटसृष्टीत सुरू आहे. हे अनोखं लग्न मोठ्या पडद्यावर कधी पहायला मिळतंय याची उत्सुकता साऱ्यांनाच लागली होती, पण आता ती संपली आहे. मराठी रसिकांचे लाडके कलाकार म्हणजेच वैभव तत्त्ववादी आणि प्रार्थना बेहरे यांची प्रमुख भूमिका असलेला ‘What’s up लग्न’ हा चित्रपट १६ मार्चला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. ‘फिनक्राफ्ट मीडिया’ अँड ‘एन्टरटेन्मेंट प्रा. लि’. या बॅनरखाली तयार झालेल्या या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन विश्वास जोशी यांनी केले आहे.

‘नटसम्राट’ चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या विश्वास जोशी यांनी या चित्रपटाच्या निमित्ताने आपली दिग्दर्शकीय इनिंग सुरु केली आहे. जाई जोशी व व्हिडीओ पॅलेस यांची ...

Category: Entertainment Updates 

Tags:

By: cine katta | March 13, 2018

संगीतकार अविनाश-विश्वजित यांचे ‘ह्रदयात वाजे समथिंग’ हे गाणे खूप गाजले. ‘ती सध्या काय करते…’ चित्रपटातील हे गाणे खुद्द विश्वजित जोशी आणि श्रीरंग गोडबोले यांनी लिहिले आहे. त्यांना या गाण्यासाठी संगीतकार आणि गीतकार अशी दुहेरी नामांकने महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण, झी गौरव, मटा सन्मान, रेडीओ सिटी आदी विविध पुरस्कारांसाठी मिळाली आहेत, तर यंदाच्या ‘मिर्ची म्युझिक अवॉर्ड’ साठी त्यांना तब्बल आठ नामांकने मिळाली असून लवकरच ‘मंत्र’ हा सिनेमा घेऊन ते चाहत्यांच्या भेटीला येत आहेत. विशेष म्हणजे या सिनेमाची निर्मिती संकल्पना विश्वजित जोशी यांची असून वेदार्थ क्रिएशन्सच्या सहयोगाने ड्रीमबुक प्रॉडक्शन्सने ‘मंत्र’ची निर्मिती केली आहे.

विविध नामांकने आणि ‘मंत्र’ विषयी बोलताना विश्वजित जोशी म्हणाले, मागील १२ – १५ वर्षांपासून आम्ही मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये विविध...

Category: Entertainment Updates 

Tags:

By: cine katta | March 09, 2018

राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट 'ख्वाडा' चे दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे लिखित आणि दिग्दर्शित 'बबन' या आगामी सिनेमाची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. येत्या २३ मार्च रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमातील गाण्यांनी यापूर्वीच सिनेरसिकांना मोहिनी घातली असून, सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या सिनेमाच्या ट्रेलरला देखील सिनेरसिकांचा कमालीचा प्रतिसाद लाभत आहे. प्रदर्शनानंतर अवघ्या काही तासांत लाखो लोकांनी ट्रेलर पहिला, आजच्या तरुण पिढीचे भावविश्व मांडणाऱ्या या सिनेमाचे द फोक कोनफ्लूअन्स इंटरटेंटमेंट हे प्रस्तुतकर्ते असून चित्राक्ष फिल्म्सने याची निर्मिती केली आहे.


'ख्वाडा' सिनेमातून नावारूपास आलेला गुणी अभिनेता भाऊसाहेब शिंदेची यात प्रमुख भूमिका असून, त्याच्यासोबतीला गायत्री जाधव हि नवोदित अभिनेत्री झळकणार आहे....

Category: Entertainment Updates 

Tags:

next>>
<<prev