By: cine katta | April 16, 2019

एक मुलगा सामान्य आवाजात वाचतोय ‘पावसाची रिपरिप चालू आहे’, मध्येच त्याला अडवत एक व्यक्ती ‘अरे सेकंड सेमिस्टर नां’, मुलगा – येस सर, मग ती व्यक्ती ‘आवाज वाढवून बोल’, पुढे तो मुलगा एकदम खड्या आवाजात ‘पावसात गाड्या उडवून कुणाच्या कपड्यावर चिखलाची बेलबुट्टी करतो रे’ काय अचंबित झालात ना? हा मुलगा नक्की काय वाचतोय? आणि मध्येच सेमिस्टर, येस सर सारखे शब्द कसे आले? अशी प्रेक्षकांच्या मनात उत्कंठा निर्माण करणाऱ्या ’६६ सदाशिव’ या चित्रपटाचा पोस्टर, टीजर आणि म्युझिक लाँच सोहळा दिमाखात संपन्न झाला. या चित्रपटाची निर्मिती ‘पुणे टॉकिज प्रा. लि.’ यांची असून चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन योगेश देशपांडे यांचे आहे.

या प्रसंगी चित्रपटाचे निर्माते हेमंत गुजराथी, विनय वाकलकर, सौरभ चिंचणकर, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, वंदना गुप्ते, प्रविण तरडे, योगेश देश...

Category: Marathi Movie marketing 

Tags:

By: cine katta | April 16, 2019

क्रिकेट आणि चित्रपट या दोन गोष्टी म्हणजे भारतीयांचे जिव्हाळ्याचे विषय आणि त्या दोन्ही एकत्र येणे म्हणजे दुग्धशर्करा योगच. हा योग ‘बाळा’ या मराठी चित्रपटाने जुळून आणला आहे. या दोन्ही गोष्टी आपली आवड म्हणून जपणारे अनेकजण असतील. मात्र त्याला आपल्या निर्धाराची जोड देत ती पूर्ण करणारे फार कमी असतात. आगामी 'बाळा' या चित्रपटातही क्रिकेटवेड्या बाळाची व त्याच्या निर्धाराची, स्वप्नांची गोष्ट उलगडणार आहे. ३ मे ला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा शानदार संगीत अनावरण सोहळा नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

‘यश अँड राज एंटरटेंन्मेट’ या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती निर्माते राकेश सिंग यांनी केली असून सचिंद्र शर्मा यांनी या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन केले आहे. उपेंद्र लिमये, क्रांती रेडकर, विक्रम गोखले, सुहासिनी मुळ्ये, कमलेश सावंत या मातब्बर ...

Category: Marathi Movie marketing 

Tags:

By: cine katta | April 02, 2019

सुखाची परिभाषा प्रत्येकाची वेगवेगळी असते. अनाथ व्यक्तीं सुध्दा सुख मिळवण्यासाठी प्रत्येक क्षण वेचत असतो आणि आपापल्या परीने सुखी राहण्याचा मार्ग शोधत असतो. परंतु अनाथांनी समाजात कितीही योग्य प्रकारे राहण्याचा प्रयत्न केला तरी समाज त्यांना खुल्या मनाने स्वीकारत नाही व अनाथ मुले वाईट मार्गाला लागतात. अशातच एक अनाथ युवक अनाथासाठी धावून येतो आणि अनाथांसाठी समाजात आधाराचा शोध घेतो. परंतु समाज त्यांना आधार देतनाही, तरी देखील ते कशाप्रकारे आधार मिळवतात हे आपणांस चित्रपट पाहिल्यावरच कळते.  अशा प्रावासाची गोष्ट म्हणजेच मराठी चित्रपट  ‘बाष्ट’ (उपर्‍यांचे अंतरंग) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  श्री साई फिल्म प्रोडक्शन निर्मित ‘बाष्ट (उपर्‍यांचे अंतरंग)’ चित्रपटाचे पोस्टर आणि  ट्रेलर  डॉ.सतीश देसाई (माजी महापौर), संजय नहा...

Category: Marathi Movie marketing 

Tags:

By: cine katta | April 02, 2019

यंदा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मराठी प्रेक्षकांना एका रंगतदार सिनेमाची मेजवानी मिळणार आहे. मल्हार फिल्मस् क्रिएशन निर्मित 'बाबो' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘इरसाल नमुन्यांनी भरलंय गाव, खुळचट गोष्टींना इथं फुल वाव’ असं मजेशीर वर्णन या चित्रपटाचे करता येईल. महाराष्ट्रातील अनेक हास्यवीर ‘बाबो’ या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाचा फर्स्ट लुक नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे.

‘बाबो’ या चित्रपटाची निर्मिती सचिन बाबुराव पवार आणि तृप्ती सचिन पवार यांनी केली असून रमेश साहेबराव चौधरी हे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. तर चित्रपटाची कथा अरविंद जगताप यांची आहे. या चित्रपटात आजवर अनेक मनोरंजक भूमिका साकारणाऱ्या कलावंतांची मांदियाळी बघायला मिळेल, या नमुनेदार गावातील नमुन्यांची ओळ...

Category: Marathi Movie marketing 

Tags:

By: cine katta | March 28, 2019

प्रेम म्हंटल की सगळ्यांना आठवत असेल आपलं पहिल प्रेम व ते मिळवण्यासाठी केलेली धडपड..तिच्या घराभोवती चकरा मारण, तिला चोरुन पाहणं, तीला शोधत राहणं...असं बरच काही अनेकांनी आपलं प्रेम मिळवण्यासाठी केलंय... असंच प्रेमाची आठवण करून देणारं एक नवं फ्रेश गाण मन मन हे प्रेक्षकांच्या नुकतंच भेटीला आलं आहे.


एका प्रियकराने आपल्या प्रेयसीला शोधण्यासाठी वापरलेली युक्ती या गाण्यातून आपल्याला बघायला मिळनार आहे. याची निर्मिती केलीये अशोक घुले व रमेश आफळे यांनी तसेच या गीताचे संगीत संगीतकार व कवी प्रसाद गाढवे यांचे आहे ... तरुणाईच्या गळ्यातल्या ताईत असणारा महाराष्ट्राचा लाडका रोहित राऊत याने हे गाणं गायलंय तर या गाण्यातून योगेश तवार व प्राजक्ता घाग हि एक नवी फ्रेश अशी जोडी आपल्याला बघायला मिळनार आहे, गाण्याचं कथानक, दिग्दर्शन अशी तिहेरी भूमिका योगेश तवार यांनी...

Category: Marathi Movie marketing 

Tags:

next>>