By: cine katta | June 07, 2019

हिंदी आणि मराठी चित्रपटांसाठी पटकथा आणि संवाद लिहिणारे उपेंद्र सिधये ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. “निर्मात्यांच्या प्रोत्साहनातून ‘गर्लफ्रेंड’ ही कलाकृती तयार होऊ शकली”, असे मत त्यांनी चित्रपटाविषयी बोलताना व्यक्त केले. अनिश जोग आणि रणजीत गुगळे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. उपेंद्र सिधये यांनी ‘मुंबई मेरी जान’ पासून आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात करत, ‘द्रीष्यम्’, ‘किल्ला’, ‘मांजा’ अशा लोकप्रिय आणि विविध धाटणीच्या चित्रपटांसाठी पटकथा व संवाद लेखन केले.

ह्यूज प्रॉडक्शन्स आणि प्रतिसाद प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटात गर्लफ्रेंड शोधणाऱ्या मुलाच्या भूमिकेसाठी सुरुवातीपासूनच अभिनेता अमेय वाघचे नाव निश्चित झाले होते, नंतर अलिशा या गर्लफ्रेंडचे पात्र ताकदीने पेलू शकेल अशा अभिनेत्रीची निवड करण्...

Category: Uncategorized 

Tags:

By: cine katta | April 16, 2019

विद्येची देवता ही श्री गणरायांची ओळख आहे. श्रींच्या १४ विद्या आणि ६४ कलांबद्दल आपल्याला माहित आहे, अलीकडच्या काळात जाहिरात ही ६५ वी कला म्हणून नावारूपाला आलेली आहे. आता यात आणखी भर पडली असून श्रीचं स्मरण करून ६६ व्या कलेबद्दल जाणून घेण्याची वेळ आली आहे. ही कला नेमकी कोणती? हे सांगण्यासाठी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी ’६६ सदाशिव’ या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

योगेश देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित “६६ सदाशिव” या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आले असून यामध्ये मोहन जोशी यांच्या विविध भावमुद्रा बघायला मिळतात. एका पोस्टर मध्ये ’६६ व्या कलेत पारंगत होण्यासाठी उपयुक्त अभ्यासक्रम!’ अशा आशयाचे एक पुस्तक मोहन जोशी यांच्या हातात दिसते. या पोस्टर्समुळे चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढली असून हा चित्रपट, पुण्याच्या ...

Category: Uncategorized 

Tags:

By: cine katta | March 10, 2019

८ मार्चला कॉलेज डायरी चित्रपट प्रदर्शित झाला .जबरदस्त ऐक्शन । |,आकर्षक संगीत ,ज्वलंत विषय वास्तविक कथानक ह्या चित्रपटाच्या जमेच्या बाजू. चित्रपटाची सुरवात,महाविद्यालय,हॉस्टेल ,दोन गट श्रेष्ठत्व ठरवण्यासाठी खेळली जाणारी जीवघेणी,विचित्र स्पर्धा, जीवावर बेतणारे स्पर्धेचे परिणाम खुन्नस,मित्रत्व,प्रेम आणि चित्रपटाचा शेवट होतो जीवघेण्या निष्कर्षाने . एकंदरीत भोळा असणा-या अनिलच्या आणि दुष्ट असणा-या बडेच्या भोवती फिरणार कथानक चित्रपटात आहे.बडेच्या अन्यायाला ,अत्याचाराला कंटाळून भोळाभाबडा अनिल आणि त्याचे मित्र याचा मध्यांतरानंतरचा अविष्कार पाहणे रंजकतेचे आणि औत्सुकतेचे ठरेल कथा जितकी दमदार तितकीच पटकथा ताकदीची ,तरुणाईच्या पसंतीचे संवाद बच्यापैकी चित्रपटात आहेत. चित्रपटाची कथा जितकी दमदार आहे तितकीच कलाकारांनी पात्रामध्ये जान ओतली आहे.त्यामुळे चित्रप...

Category: Uncategorized 

Tags:

By: cine katta | January 31, 2019

सगळीकडेच सार्वत्रिक निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. कॉलेजच्या कट्ट्यापासून गावातील चावडीपर्यंत आणि युट्यूब चॅनल पासून वृत्तवाहिन्यांच्या पॅनलपर्यंत सध्या निवडणूक, राजकारण, मतदान, विकास आणि सर्वसामान्यांच्या समस्या यावर जोरदार चर्चा होताना दिसते. मग या सगळ्या पार्श्वभूमीवर मनोरंजनाचा एक भक्कम डिजिटल मंच निर्माण करून देणारी भाडिपा अर्थात ‘भारतीय डिजिटल पार्टी’ ही संस्था मागे कशी राहील? गुगलचा न्यूज इनोवेशन फंड प्राप्त करणारी भाडिपा ही आशिया पॅसिफिक मधील एकमेव मनोरंजन संस्था आहे. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर खुमासदार शैलीत टीका करत निखळ विनोदनिर्मिती करणे हा भाडिपाचा यु.एस.पी. आहे. पण आता केवळ मनोरंजनापुरती मर्यादित न राहता ‘लोकमंच’ या कार्क्रमाच्या माध्यमातून या संस्थेने एक नवा उपक्रम हाती घेतला आहे. निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर तरुण मतदार आणि...

Category: Uncategorized 

Tags:

next>>