By: cine katta | March 10, 2019

८ मार्चला कॉलेज डायरी चित्रपट प्रदर्शित झाला .जबरदस्त ऐक्शन । |,आकर्षक संगीत ,ज्वलंत विषय वास्तविक कथानक ह्या चित्रपटाच्या जमेच्या बाजू. चित्रपटाची सुरवात,महाविद्यालय,हॉस्टेल ,दोन गट श्रेष्ठत्व ठरवण्यासाठी खेळली जाणारी जीवघेणी,विचित्र स्पर्धा, जीवावर बेतणारे स्पर्धेचे परिणाम खुन्नस,मित्रत्व,प्रेम आणि चित्रपटाचा शेवट होतो जीवघेण्या निष्कर्षाने . एकंदरीत भोळा असणा-या अनिलच्या आणि दुष्ट असणा-या बडेच्या भोवती फिरणार कथानक चित्रपटात आहे.बडेच्या अन्यायाला ,अत्याचाराला कंटाळून भोळाभाबडा अनिल आणि त्याचे मित्र याचा मध्यांतरानंतरचा अविष्कार पाहणे रंजकतेचे आणि औत्सुकतेचे ठरेल कथा जितकी दमदार तितकीच पटकथा ताकदीची ,तरुणाईच्या पसंतीचे संवाद बच्यापैकी चित्रपटात आहेत. चित्रपटाची कथा जितकी दमदार आहे तितकीच कलाकारांनी पात्रामध्ये जान ओतली आहे.त्यामुळे चित्रपटातील पात्रे वास्तववादी वाटतात.जबरदस्त ऍक्शन दृश्यामुळे चित्रपट कंटाळवाणा अजिबात वाटत नाही.हिंदी, दाक्षिणात्य चित्रपटांप्रमाणे ग्लॅमर,ऍक्शन च्या तडक्यामुळे चित्रपट गुंतवून ठेवतो. दिग्दर्शकाला कथानकाला योग्य न्याय देण्यात यश आले आहे.अनिकेत घाडगे याचा हा पहिलाच चित्रपट आहे.दिग्दर्शकाने प्रेक्षकांच्या मनाचा अचूक वेध घेतल्याने चित्रपट वास्तववादी ठरतो असे म्हणने वावगे ठरणार नाही.ज्वलंत विषय ,भावभावनांना हाताळताना कुठेही कंटाळवाणा चित्रपट वाटणार नाही याची काळजी दिग्दर्शकाने घेतली यात दिग्दर्शकाचे कौशल्य दिसते. प्रत्येक कलाकाराने भूमिकेस वाहून घेतले आहे .अनिलच्या भूमिकेला (विशाल सांगळे) ने तर बडेच्या भूमिकेला (अविनाश खेडेकर ) याने योग्य न्याय दिला आहे.खलनायकाची बॉडी लैंग्वेज जबरदस्त । आहे.मध्यांतरापर्यंतच पडद्यावर झळकणारी अभिनेत्री वैष्णवी शिंदे तिच्या नाजूक अभिनयाने पात्र फुलले आहे .वैष्णवीच्या लक्ष्यवेधी भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करेल यात शंका नाही.सर्व कलाकार जरी नवखे असले तरी त्यांचा नैसर्गिक अभिनय कुठेही त्यांचा नवखेपणा दाखवून देत नाहीत . चित्रपटाला दाक्षिणात्य स्त्री संगीतकार रेवा यांनी संगीतमय केले आहे .हा त्यांचा संगीतमय केलेला पहिला मराठी चित्रपट आहे .चित्रपटाची अभिमानाची बाब म्हणजे वेगवेगळ्या भाषांमधली पाच गाणी असणारा चित्रपट असा विश्वविक्रमाचा मान ह्या चित्रपटाने पटकावला आहे. महाविद्यायीन विद्यार्थ्यांच्या जवळचा वास्तववादी ,ज्वलंत विषय असल्याने संपूर्ण महाराष्ट्रतून उत्तम प्रतिसाद चित्रपटाला मिळत आहे.

Category: Uncategorized 

Tags:

Comments:

Be the first to comment ...

Post a Comment